शहादा: पुसनद गावात आदिवासी वसाहतीत काँक्रिटीकरण रस्त्यांचे निकृष्ट कामकाज ग्रामस्थांची नाराजी #Jansamasya
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पुसनद गावात आदिवासी वसाहती रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला नागरिक कंटाळले असून त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.