अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील मौजा कवठा (डोंगरगाव) येथे दिनांक ४ ते १० जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या श्रीमद्भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह अंतर्गत गावालगतच्या निसर्गरम्य पहाडीवरील कोकनाई माता मंदिरात गोवर्धन पूजेचा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला.या प्रसंगी ह.भ.प. बुराडे महाराज यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. गोवर्धन पूजेचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व विशद करताना महाराज म्हणाले की, भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून भक्तांचे संरक्षण केले.