राज्यामध्ये सातत्याने महापुरुषांच्या विटंबनाच्या घटनेत वाढ होत आहे. त्यामुळे अशा घटना कुठेच घडू नये व घटनेतील आरोपींना कठोरात-कठोर शासन व्हावे जेणेकरून अशा घटना पुन्हा उद्भवणार नाहीत यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने कठोरात कठोर कायदे करावेत अशी मागणी छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांनी केली आहे. आज सोमवारी सकाळी राहुरी पोलीस ठाणे आवारात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली आहे.