नागपूर ग्रामीण: खडगाव रोडवरील गोडाऊन समोर ठेवण्यात आलेले कॉपर वायर चोरून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
खडगाव रोडवरील गोडाऊन समोरून कॉपर वायर चोरी गेल्याची तक्रार विनोद कानतोडे यांनी वाडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती याप्रकरणी वाडी पोलिसांनी तपास करून आरोपी संचितकुमार सिंग, दीपक कुमार महतो यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यासंबंधी विचारपूस केली असता त्यांनी वायर चोरल्याचा गुन्हा कबूल केला. आरोपींनी हा मुद्देमाल कबाडी व्यापारी योगेश शाहू यांना विकला होता. पोलिसांनी या प्रकरणात त्यांनाही ताब्यात घेतले.