रामटेक: नागार्जुन परिसरात राष्ट्रीय बजरंग दलाने अवैध वाहतूक करताना पकडले 14 गोवंश बैल
Ramtek, Nagpur | Oct 19, 2025 तुमसर कडून रामटेक कडे 14 गोवंश बैल निर्दयतेने भरून कत्तलखान्यात नेणाऱ्या एका आयशर वाहन क्रमांक एम एच 40 सीएम 44 79 ला नागार्जुन परिसरातील टुरिस्ट ढाब्या समोर थांबवून त्यात कोंबलेले 14 बैलांचे प्राण वाचविण्यात राष्ट्रीय बजरंग दलाचे विवेक शुक्ला यांना यश आले आहे. शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर रात्री अकरा वाजता च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. पुढील कारवाई रामटेक पोलिसांनी केली व पशुना देवलापार गोशाळेत पाठविण्यात आले.