बिबट्याची शिकार करणाऱ्या तीन संशयित आरोपीला वनपरिक्षेत्र पथकाने मोठ्या शितापीने अटक केली आहे. वर्धा वनविभागातर्फे भिकुंड परिसरात बिबट्याची शिकार केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कर्णासे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे तेथून पहिल्या संशय त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून या गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार व इतर पुरावे जप्त करण्यात आले.