नायगाव-खैरगाव: कोलंबी येथे अज्ञात चोराने चोरी करत 1 लाख 46 हजारांचे सोन्याचे ऐवज नेले चोरून, नायगाव पोलिसांत गुन्हा नोंद
दि. 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 ते दि. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 च्या दरम्यान कोलंबी येथील रहिवासी असणारे रेणुकाबाई टोकलवाड यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील पत्राच्या पेटीचे कुलूप फोडून 1,46,300 सोन्याचे दागिने कुणीतरी अज्ञात चोराने चोरून नेले होते, ह्या प्रकरणी नायगाव पोलीसात फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सपोनि पोमनाळकर हे करत आहेत.