राहाता: साई बाबांच्या व्हीआयपी दर्शनासाठी घेतली लाच.. साईमंदिर प्रमुख विष्णू थोरात यांच्यावर गंभीर आरोप..
शिर्डी येथील साई मंदिराचे प्रमुख विष्णू थोरात यांच्यावर गंभीर आरोप झाले असून एका भाविकाकडून व्हीआयपी दर्शनाच्या बदल्यात भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप होत असल्याने साई मंदिर प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी या प्रकरणाची माहिती देत मंदिर प्रमुखांविरोधात आवाज उठवला आहे. त्यांच्या मते घटनेला तब्बल 20 दिवस उलटूनही साई संस्थांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. उलट संस्थांकडून सीसीटीव्ही फुटेज लपवण्याचा व टाळाटाळ करण्याचा प्रयत्न होत आहे.