सिकलसेलआजारा विषयी लोकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टिने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह दि. ११ ते १७ डिसेंबर २०२५ दरम्यान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयात रक्त तपासणी व समुपदेशन शिबीरे आयोजित करण्यात येत आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाक्टी अंतर्गत बोंडगावदेवी येथील आश्रमशाळेत सिकलसेल सप्ताह निमित्त रक्त तपासणी व समुपदेशन शिबीरे आयोजित करण्यात आले होते.