नेवासा: आचारसंहिता काळात नियमांचे पालन करा - पाटील
नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.आचारसंहिता भंगाच्या तक्रारींसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन झाला आहे.मतदाराला २ मते द्यायची आहेत. १ मत नगराध्यक्ष पदाला,तर दुसरे मत नगरसेवक पदाला द्यावे लागणार आहे. आचारसंहिता काळात नियमांचे पालन करा,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.