अर्जुनी मोरगाव: नवेगावबांध सह इतर गावांचा दौरा करून आमदार राजकुमार बडोले यांनी केली नुकसानग्रस्त धान पिकाची पाहणी
अर्जुनी-मोर. तालुक्यात 24 ऑक्टोबर पासुन मुसळधार अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे तालुक्यातील धान पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतक-यांची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांना हिंमत व बळ देण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी अर्जुनी-मोर. तालुक्यातील नवेगावबांध, देवलगाव, कोरंभी, व ताडगाव परिसराचा दौरा केला. व थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचुन नुकसानग्रस्त शेतीची पहाणी केली. व शेतक-यांना धीर दिला.