5 डिसेंबरला पेंच व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र एकसंघ नियंत्रण पवनी अंतर्गत मौदी शिवारात एका वाघाच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू झाल्याच्या घटनेला 24 तासही उलटत नाहीत तोच याच वनपरिक्षेत्रातील अंबाझरी शिवारात रविवार दिनांक 7 डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान अनिल डोनारकर हे बकऱ्या चारत असताना एका बिबट्याने एका बकऱ्यावर हल्ला करीत त्याला ठार केले आहे.तर एका बैलाला जखमी केल्याची घटना घडली आहे.