शिंदखेडा: खलाणे बस स्थानकाजवळ डंपरच्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू अज्ञात चालका विरुद्ध शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल.
शिंदखेडा तालुक्यातील खलाणे बस स्थानकाजवळ डंपरच्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खलाणे बस स्थानकाजवळ प्रवासी ह्या आपल्या बसची वाट बघत असताना उभे असताना मागून येणाऱ्या डंपरणे ब्रेक न लागल्याने सदर प्रवाशांचा अंगावर डंपर चालून आले. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडून आली आहे. सदर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असता यावरून अज्ञात चालकाविरुद्ध शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.