औंढा नागनाथ: महसूल पथकाने शिरड शहापूर येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर वाहन पकडले 6 लाख 5 हजाराचा मुद्देमाल जप्त
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे बसस्थानक ते गावात जाणाऱ्या रोडवर अवैध वाळू वाहतूक करणारे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर वाहन औंढा नागनाथ तहसील कार्यालयाच्या महसूल पथकांने दिनांक 25 नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळी साडेदहा वाजे दरम्यान कारवाई करून पकडून वाहन व वाळूसह 6 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मंडळ अधिकारी सुरेश बोबडे यांच्या फिर्यादीवरून चालकावर सायंकाळी चार वाजे दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारवाई तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली