रोहा: रोहा रुग्णालयात रुग्णाना दीर्घकाळ प्रतीक्षा असलेल्या डायलेसिस सेवेचा लोकार्पण सोहळा ना. अदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न
Roha, Raigad | Jul 6, 2025 रोहा तालुका आणि परिसरातील किंडनी विकार रुग्णास डियालेसिस उपचाराकरिता इतरत्र जावे लागत होते. उपजिल्हा रुग्णालय,रोहा येथे किडनी विकार रुग्णास डायलेसिस उपचार उपलब्ध झाले आहेत.शनिवार दि.५ जुलै रोजी सायंकाळी 5 वा. महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास मंत्री ना.अदिती तटकरे यांच्या हस्ते या सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला.सदर कार्यक्रमास व्यासपीठावर जिल्हा रुग्णालय अलिबाग़ येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण शिंदे,माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, तसेच सभागृहात माजी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.