जिल्ह्यात आयोजित विविध आंदोलन तसेच नगरपरिषद नगरपंचायत निवडणुका बघता जिल्ह्यात चार डिसेंबर पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात विविध पक्ष संघटना कडून त्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्ता रोको, जेलभरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. तसेच नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक संदर्भात आदर्श आचारसंहिता लागू आहे.