भंडारा: नांदेड येथे गाव स्तरीय कार्यशाळा संपन्न ; शेकडो नागरीकांची ऊपस्थिती
ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी गाव स्तरीय कार्यशाळा १५ सप्टेबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास नांदेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या कार्यशाळेत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञांनी ग्रामीण विकास योजना, स्वच्छता अभियान, पाणी व्यवस्थापन, शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल ग्रामविकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती दिली.