नांदुरा: नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे प्रभाग क्रमांक ७ मध्ये घाणीचे साम्राज्य;नागरिकांचा बळी गेल्यास नगर परिषद जबाबदारी घेईल का?
नांदुरा शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये अक्षरशा घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. याबाबत येथील नागरिकांनी अनेक वेळा नगरपरिषद प्रशासनाला निवेदने दिलेले आहेत परंतु नगरपरिषद प्रशासन निवडणूक असल्याच्या नावाखाली याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय. या घाणीच्या साम्राज्यामुळे एखाद्या नागरिकांचा बळी गेल्यास नगरपरिषद जबाबदारी घेईल का असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे.