भरधाव वेगाने येणाऱ्या मिक्सर ट्रक आणि पॅजो रिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच दुदैवी मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता गंगापूरी गावाजवळ घडली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी रविवारी १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार झालेल्या ट्रक चालकाला दुपारी २ वाजता अटक करण्यात आली आहे.