रामटेक: अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा या मागणीसाठी भाजपाचे तहसीलदार रामटेक यांना निवेदन
Ramtek, Nagpur | Nov 1, 2025 मागील दोन दिवसात रामटेक तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे क्षेत्रातील शेतकऱ्यांचे धान व कापसाचे हाता तोंडाशी आलेले पीक जमीन दोस्त झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाद्वारे त्वरित करून नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन भाजपा रामटेक मंडळाद्वारे तहसीलदार रामटेक रमेश कोळपे यांना शनिवार दिनांक एक नोव्हेंबरला सकाळी साडे अकरा वाजता देण्यात आले. तहसीलदार कोळपे यांनी काही भागात जाऊन पिकांची पाहणी केली.