शेतातील झाड कापण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका तरुणावर कुऱ्हाडीच्या दांडाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना चिचगाव (ता. साकोली) शेत शिवारात घडली. फिर्यादी विकास पांडुरंग राहांगडाले (३९, रा. चिचगाव) हे २२ डिसेंबर रोजी सायंकाळी आपले ट्रॅक्टर शेतात लावून घरी परतत असताना, आरोपी मनीष नरेश राहांगडाले (२५), राजन नरेश राहांगडाले (२३) व नरेश शामराव राहांगडाले (५०) हे झाड कापत असल्याचे त्यांना दिसले. फिर्यादीने याबाबत विचारणा केली असता, आरोपी मनीषने शिवीगाळ करत त्यांच