लातूर -लातूर शहराच्या राजकीय इतिहासात प्रथमच तृतीयपंथी समाजातून प्रतिनिधित्व करण्यासाठी उचललेले धाडसी पाऊल चर्चेचा विषय ठरत आहे. माऊली लातूरकर यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करून सामाजिक राजकारणात अभूतपूर्व बदलाची नांदी केली आहे.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी 3 वाजता झालेल्या कार्यक्रमात माऊली लातूरकर यांनी अधिकृतरीत्या भाजपमध्ये प्रवेश केला.