वाशिम: घटनास्थापना ते विजयादशमी श्री दुर्गामाता दौड ला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात
Washim, Washim | Sep 22, 2025 घटनास्थापना ते विजयादशमी अशा संपूर्ण दहा दिवस वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून श्री दुर्गामाता दौड ला आज दि. 22 सप्टेंबर रोजी सुरुवात करण्यात आली असून, या दौड मध्ये श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान, सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते व शहरवासी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.