बार्शी: आत्महत्या करू नका, जीवन लाखमोलाचे!" बार्शी निवासस्थानी आमदारांचे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भावनिक आवाहन
Barshi, Solapur | Sep 27, 2025 बार्शी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि शेतमजूर बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी बाधित शेतकऱ्यांना मनोधैर्य खचू न देण्याचे आणि आत्महत्येसारखा कोणताही चुकीचा विचार न करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. त्यांनी बार्शी येथील निवासस्थानी संवाद साधला. सदरच्या संवाद 27 रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास साधला. नुकसान भरपाईच्या प्रक्रियेत काही अडचण आल्यास किंवा मदत लागल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन आमदार सोपल यांनी केले आहे.