धुळे: सोनगीरमध्ये कंपनी कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या; नातेवाईकाचा फोन उचलत नसल्याने उघडकीस आले प्रकरण
Dhule, Dhule | Oct 18, 2025 धुळे तालुक्यातील सोनगीर येथे खासगी कंपनीत काम करणाऱ्या गुंजेश कुमार या तरुणाने १७ ऑक्टोबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी संपर्क न झाल्याने सहकाऱ्यांनी पाहणी केली असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह खाली उतरवला आणि रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्येमागील कारण अस्पष्ट असून, सोनगीर पोलिस तपास करत आहेत.