धुळे: नकाणे गावातून वीस लाखांचे शौचालय 'हरवले'; धुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह! उबाठ शिवसेना आक्रमक
Dhule, Dhule | Sep 30, 2025 धुळे शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना (उबाठा) गटाने आरोप केला की, नकाणे गावातील आदिवासी वस्तीत महिलांसाठी तब्बल २० लाख खर्चून बांधलेले दहा आसनी शौचालय कागदोपत्री दाखवले असले तरी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. ठेकेदाराने बिलही काढले आहे. ग्रामस्थ आजही उघड्यावर शौचास जात असून, या ‘शौचालय चोरी’ प्रकरणात महापालिका व लोकप्रतिनिधींचा सहभाग असल्याचा आरोप करून उबाठा गटाने पोलीस तक्रारीचा इशारा दिला आहे.