जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले;बीड जिल्ह्यातील गोदावरी पत्रा शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा
Beed, Beed | Sep 15, 2025 जायकवाडी प्रकल्पाचे आपत्कालीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.बीड जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने सोमवार, 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता प्रसार माध्यमांद्वारे ही माहिती दिली.नागरिकांनी नदीकाठी अनावश्यक वावर टाळावा, जनावरे व महत्त्वाचे सामान सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.