कुरखेडा: ग्रामपंचायत गेवर्धा येथील संयुक्त ग्रामसभेत विकास कामावर चर्चा व तंठा मूक्ती समीतीवर पाचव्यांदा राजू बारई यांची निवड
आज दि.१६ सप्टेबंर मंगळवार रोजी दूपारी १२ ते ३ वाज़े दरम्यान गट ग्रामपंचायत गेवर्धा येथे ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट सर्व गावांची संयुक्त ग्रामसभा सांस्कृतिक सभागृहात ज्येष्ठ नागरिक सुरेश पुसाम यांचा अध्यक्षतेखाली पार पडली.आजच्या ग्रामसभेत ग्रामविकासाबद्दल विविध विषयावर अतिशय चांगल्या वातावरणात चर्चा करण्यात आली.तसेच सदर ग्रामसभेत महात्मा गांधी ग्राम तंटामुक्त समीतीवर सलग पाचव्यांदा राजू बारई यांची अविरोध निवड करण्यात आली.