धुळे जिल्ह्यात ईपीएस ९५ पेन्शनधारकांनी न्याय हक्क आणि किमान ७५०० रुपयांच्या पेन्शनवाढीसाठी आज निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना भेट देत पंतप्रधानांच्या नावे निवेदन सादर केले. गेल्या दहा वर्षांच्या आश्वासनांनंतरही निर्णय न झाल्याने संतापलेल्या वरिष्ठ नागरिकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयानुसार उच्च पेन्शन व वैद्यकीय सुविधा द्याव्यात, या मागणीवर तोडगा न निघाल्यास ४ डिसेंबरला दिल्लीतील जंतरमंतरवर ‘करो या मरो’च्या इशाऱ्यासह विशाल आंदोलन छेडण्याचा कडका इशारा सरकारला देण्यात आला