कोपरगाव: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आतापर्यंत २० हजार कोटींचा निधी पोहच, कृषिमंत्री दत्ता भरणे
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 31 हजार कोटीपैकी आजपर्यंत 20 हजार कोटींची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचली असल्याची माहिती कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी आज ७ नोव्हेंबर रोजी दिली. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे कर्मवीर कृषी महोत्सवाच्या संवाद साधताना ना.भरणे बोलत होते.