शिरपूर: तालुक्यातील जामन्यापाणी वनक्षेत्रात गांजा शेती उद्धवस्त, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि तालुका पोलिसांची संयुक्त कारवाई
Shirpur, Dhule | Nov 28, 2025 नाशिक येथील अंमली पदार्थ विरोधी पथक आणि तालुका पोलिसांनी शिरपूर तालुक्यातील जामण्यापाडा येथे वनजमिनीवर छापा टाकून 1 कोटी 2 लाख 50 हजार रुपये किमतीचा 2 हजार 50 किलो गांजा जप्त करून गांजा शेती उध्वस्त केली.सदरची कारवाई दोन दिवस राबविण्यात आली.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे.त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 30 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे.