उष्माघात ही उन्हाळ्यातील एक सामान्य समस्या आहे. ही समस्या तीव्र सूर्यप्रकाश किंवा उष्णतेच्या दीर्घकाळापर्यंत संपर्कात राहिल्यामुळे होऊ शकते उन्हाळी हंगामातील उष्मालाटेमुळे उदभवणार्या उष्माघातांनी मानव,पशु- प्राणी व शेती पिकांवर होणारे दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीने उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक काजळकर यांनी सोमवार दि.9 मार्च 2026 रोजी दु. 4 वा. केलं.