कोपरगाव: शहरातील परजने लॉ कॉलेज येथे विश्व महानुभाव भोपे व पुजारी समाज संघटनेच्या स्थापनेसाठी बैठक संपन्न
कोपरगाव शहरातील नामदेवराव परजने पाटील लॉ कॉलेज येथे आज ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा अखिल विश्व महानुभाव भोपे, पुजारी समाज संघटनेच्या स्थापणेसाठी चौथी बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.प्रसिद्ध ज्योतिषाचार्य प्रभाकरआप्पा भोजने यांनी मार्गदर्शन केले. बैठकीच्या अध्यक्षास्थानी श्री क्षेत्र पांचाळेश्वर येथील दत्त मंदिराचे पुजारी व पोलीस पाटील मदनराव कोठी हे होते. बैठकीचे आयोजक डॉ.हिरालाल महानुभाव यांनी केले .यावेळी श्री क्षेत्र जाळीचा देव येथील पुजारी सुधाकर उदरभरे उपस्थित।होते.