चांदूर रेल्वे: चांदूरवाडी नजीक कुऱ्हा रोडवर मीरा इंडस्ट्रीज ला भीषण आग; 10 करोड रुपयांच्या वर आर्थिक नुकसान; अग्निशमन दलाने आग आटोक्यात
चांदुर रेल्वे कुऱ्हा रोड वरील मीरा इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग. दहा कोटींहून अधिक नुकसान.चांदुर रेल्वे येथील कुऱ्हा रोडवरील असलेल्या मीरा इंडस्ट्रीज (डाळ मिल) येथे आज सकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने अल्पावधीतच रौद्ररूप धारण केल्याने कारखान्यातील मशिनरी, चणा व इतर साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे दहा कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.कारखान्यातील काही कामगारांच्या लक्षात आग येताच त्यांनी तातडीने इंडस्ट्रीजचे मालक गंगन यांना माहिती द