दापोली: केळशी किनारा मोहल्ला परिसरात ४ लाखांचे चरस जप्त, एकाला अटक
दापोली तालुक्यात केळशी किनारा मोहल्ल्यात पोलिसांनी छापा टाकून सुमारे चार लाख रुपये किमतीचा चरस जप्त केला आहे. विशेष म्हणजे, या चरसच्या पॅकेजिंगवर “6 Gold” असा इंग्रजी मजकूर आणि काही कोरियन भाषेतील अक्षरे लिहिलेली आढळली आहेत, १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केळशी किनारा मोहल्ल्यातील अब्रार इस्माईल डायली (वय ३२) यांच्या घरावर छापा टाकला