समुद्रपूर: खापरी येथील जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी :विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकाविला
समुद्रपूर: उच्च प्राथमिक शाळा खापरी येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवंत परंपरा जपत जिल्हा स्तरीय सायन्स एक्झिबिशनमध्ये तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातील नामांकित कॉन्व्हेंट तसेच CBSE बोर्डाच्या शाळांतील एकूण १०० मॉडेल्स सहभागी झाली होती.अशा तीव्र स्पर्धेत ऋषिकेश देठे, तानिया ईश्वर धारणे, सिद्धी संदीपराव देशमुख, अर्पिता कुबडे यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिक मॉडेलला परीक्षकांनी उच्च गुण देत जिल्ह्यात तृतीय क्रमांक जाहीर केला.