पनवेल: अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल अखेर लागला, पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी पालदेवर यांनी सुनावली शिक्षा
Panvel, Raigad | Apr 21, 2025 राज्यभर खळबळ उडवणाऱ्या अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल अखेर लागला आहे. मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेप आणि 20 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली होती, अशी गंभीर टिपणी करत न्यायालयाने ही शिक्षा दिली. या प्रकरणातील सहआरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना 7 वर्षांच्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत. मात्र, या दोघांनी तुरुंगात आधीच आपली शिक्षा पूर्ण केली असल्याने त्यांची सुटका करण्यात येणार आहे.