राळेगाव: वेगवेगळ्या कारवाईत दोन ट्रॅक्टर जप्त , राळेगाव महसूल विभागाची बोरी मेंगापूर येथे घाटात कारवाई
राळेगाव तालुक्यातील बोरी मेघापूर येथे रेती घाटातून सुद्धा मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असल्याची बाब कारवाईतून समोर आली आहे महसूल विभागाच्या पथकाने रेती तस्करीचे दोन ट्रॅक्टर पकडून 16 लाख 14 जणांचा मुद्देमाल जप्त केला व या कारवाईत आरोपी तीन जणांविरुद्ध दिनांक एक डिसेंबर रोजी राळेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.