वहिवाटीच्या जमिनीचा वाद आणि जुन्या अर्जाच्या कारणावरून एका कुटुंबाला लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (२४ डिसेंबर) सकाळी शेल पिंपळगाव, ता. खेड येथे घडली.या प्रकरणात प्रशांत विलास दौंडकर (३४, शेल पिंपळगाव, ता. खेड) यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.