अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध व आसपासच्या गावामध्ये गेल्या 15 ते 20 दिवसापासून वाघ व बिबट्याने चांगला धुमाकूळ घातल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खोली येथील नारायण कापगते यांच्या म्हशीची वाघांने शिकार केल्याची धक्कादायक घटना दिनांक ३ डिसेंबर रोजी बुधवारला उघडकीस आली. यामुळे पशुपालकामध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा परिसर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्याने या परिसरात नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर असतो.