पुरंदर: पिंपरे खुर्द येथील तरुणांनी आपल्या दिवंगत मित्रांना वाहिली अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली
Purandhar, Pune | Apr 24, 2024 पुरंदर तालुक्यातील पिंपळे खुर्द येथील तरुणांनी मागील वर्षी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आपल्या तीन मित्रांना त्यांच्या स्मृतिदिना निमित्त अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली. पिंपरे आणि परिसरातील तरुणांनी एकत्र येत अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आपल्या मित्रांना रक्तदान करून श्रद्धांजली दिली आहे . पिंपरे खुर्द येथील दिवंगत ओंकार थोपटे, अमोल थोपटे, पोपट थोपटे या तरुणाचा गेल्या वर्षी नीरा-लोणंद मार्गावर अपघाती मृत्यू झाला होता.