भंडारा जिल्हा परिषद कुंभली केंद्रांतर्गत असलेल्या आलोक वरिष्ठ प्राथमिक शाळा, चिचटोला/पळसगांव येथे शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला. या महोत्सवात इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक खेळांमध्ये आपला दम दाखवला, तर सांस्कृतिक कार्यक्रमांतून आपल्या कलागुणांचा अविष्कार घडवत उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार नाना पटोले यांची उपस्थिती; त्यांनी प्रत्