हिंगणघाट: कलोडे सभागृह समोरील अवैध झोपडपट्टीचे दुसरीकडे पुनर्वसनासाठी सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अखेर चौथ्या दिवशी यशस्वी
हिंगणघाट शहरातील कलोडे सभागृह समोरील अवैध झोपडपट्टीचे दुसरीकडे पुनर्वसनाच्या मागणीसाठी सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अखेर चौथ्या दिवशी यशस्वी झाले.प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर झोपडपट्टी हटाव संघर्ष समिती आणि संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांनी अन्नत्याग उपोषणावर बसलेले दिलीप बालपांडे, राहुल झाडे, शितलताई राऊत, उमाताई भोयर यांनी तहसीलदार योगेश शिंदे, मुख्याधिकारी उरकुडे , ठाणेदार राऊत यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन उपोषण सोडले.