भोकरदन: निमखेडा नदीवरील पुलाची दुरवस्था, 8 नोव्हेंबरला रास्ता रोको, शिवसेना ता.अध्यक्ष वानखेडेनी पो. ठा. येथे माहिती
आज दिनांक 4 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन शहरातील पोलीस ठाणे येथे शिवसेनेचे भोकरदन तालुका अध्यक्ष वानखेडे यांनी माहिती दिली आहे की भोकरदन ते हसनाबाद या राष्ट्रीय महामार्गावर निमखेडा गावाजवळ असलेल्या नदीवरील पुलाची दुरवस्था झाली आहे, जीव मुठीत घेऊन या ठिकाणाहून प्रवास करावा लागत आहे,त्यामुळे प्रशासनाचे व संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी 8 नोव्हेंबरला कुंभारी पाटी येथे रास्ता रोको आहे.