नेवासा: घोडेगावात कांद्याच्या आवकेत वाढ ; हा मिळाला भाव..!
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये शनिवारी कांद्याची ७५ हजार ६३६ कांदा गोण्या आवक झाली. बुधवारच्या तुलनेत शनिवार १ नोव्हेंबर रोजी १९ हजार कांदा गोण्यांची जास्त आवक झाली. शनिवारी झालेल्या कांदा लिलावात अपवादात्मक कांद्याला १९०० ते २२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.