जालना: जालना शहरात वाहतूक नियमांवर विशेष मोहीम; 375 वाहनांवर कारवाई, 3.67 लाखांचा दंड; कारवाई सुरुच ठेवण्याचा इशारा
Jalna, Jalna | Mar 12, 2026 जालना शहरात मोटार वाहन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष वाहतूक मोहीम राबवली. गुरुवार दि. 12 मार्च 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या 375 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून एकूण 3 लाख 67 हजार 750 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई अशीच सुरु ठेवण्याचा इशरा शहर वाहतुक शाखेने दिला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई केली.