विक्रमगड: बोईसर- दांडीपाडा परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल
बोईसर पोलीस ठाणे हद्दीतून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोईसर- दांडीपाडा परिसरातील पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण अज्ञात इसमाने केले आहे. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 137 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.