हिंगणघाट: आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या नेतृत्वात ज्ञानेश्वर वॉर्ड मधील शेकडो महिला, पुरुष कार्यकर्त्यांचा भाजपात पक्ष प्रवेश
हिंगणघाट :विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांचे कार्यशैलीने प्रभावित होऊन शहरातील संत ज्ञानेश्वर वार्ड येथील महिला तसेच युवा कार्यकर्त्यांनी श्री. मारोती सहारे व सौ. कविताताई सहारे यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला.यात सौ. वनिताताई वानोडे, सौ. मायाताई मांडवकर, सौ. विशाखाताई बेदुरकर, सौ. उषाताई गहलोत, सौ. रोशनीताई गहलोत, सौ. मंजुषाताई भालकर, सौ. लक्ष्मीताई देशमुख, आंदिसह शेकडोनी पक्ष प्रवेश केला.