वैजापूर: किरतपूर फाटा येथे भरदिवसा एकाला लुटले घटना,पोलिसांत गुन्हा दाखल
दोघांना भरदिवसा चाकूचा धाक दाखवत तिघा चोरट्यांनी लुटल्याच्या दोन वेगवेळ्या घटना वैजापूर तालुक्यातील किरतपूर फाटा व पुरणगाव चौफुली येथे बुधवारी रोजी घडली.या प्रकरणात अज्ञात चोरट्या विरोधात वैजापूर पोलिसांत शनिवार रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणात सुरेश माधव सिंग वय ३६ वर्षे राहणार उत्तरप्रदेश हल्ली मुक्काम दत्तनगर श्रीरामपूर यांनी फिर्याद दिली आहे.