जालना शहरातील शिवाजी पुतळा परिसरातील एटीएममध्ये कार्ड बदलून एका चालकाची 14 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बुधवार दि. 10 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी फसवणूक करणार्या अज्ञात इसमाविरुद्ध सदरबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विकास प्रकाश जाधव (वय 38, रा. भिमनगर, जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पत्नी रेखा जाधव यांच्यासह शिवाजी पुतळा समोरील एटीएम मध्ये हा प्रकार झाला.